कॅनझस
कॅनझस : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी पश्चिम-उत्तर-मध्य विभागाच्या व देशाच्या महाद्वीपीय भूमीवरील मध्यावरचे राज्य. ३७० उ. ते ४०० उ. आणि ९४० ३८’ प. ते १०२० १’ प.; क्षेत्रफळ २,१३,८८६ चौ. किमी.; लोकसंख्या२२,४९,०७१ (१९७०). याच्या दक्षिणेस ओक्लाहोमा, पश्चिमेस कोलोरॅडो, उत्तरेस नेब्रॅस्का आणि ईशान्येस व पूर्वेस मिसूरी ही राज्येआहेत. टोपीका ही राज्याची राजधानी आहे.